जैन इरिगेशनद्वारा अमेरिकेतील दोन सिंचनप्रणित कंपन्यांचे अधिग्रहण

मुंबई, १९ एप्रिल (प्रतिनिधी):- जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडने त्यांच्या अमेरिकेतील (युएसए) उपकंपनीच्या माध्यमातून दोन मोठ्या सिंचनप्रणित कंपन्यांचे ८० टक्के भागभांडवल खरेदी करून अधिग्रहण केले आहे. अमेरिकेतील ऍग्री व्हॅली इरिगेशन (एव्हीआय) आणि इरिगेशन डिझाईन एण्ड कन्स्ट्रक्शन (आयडीसी) या सूक्ष्मसिंचन क्षेत्रातील  सर्वात मोठ्या वितरक कंपन्या म्हणून ओळखल्या जातात. या दोन्ही कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीनंतर एक स्वतंत्र नवीन वितरण कंपनी जैन इऱिगेशन स्थापन करणार आहे. याद्वारे अमेरिकेतील शेतकऱ्यांना जैन इरिगेशनच्या अत्याधुनिक उच्चकृषी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक नावीन्यपूर्ण असे उच्चकृषी तंत्रज्ञान, त्याचे आरेखन, सेवा व उभारणी दिली जाईल व यातून त्यांना मोअर क्रॉप पर ड्रॉप ची अनुभूती घेता येईल.  

या कराराची मुख्य वैशिष्ट्ये कॅलिफोर्नियातील या सर्वात मोठया दोन वितरक कंपन्यांच्या एकत्रिकरणातून 13 ठिकाणी असलेली त्यांची वितरण व्यवस्था २२५ हून अधिक सहकाऱ्यांच्या माध्यमातून तेथील जैन इरिगेशनचे वितरण होईल सशक्त.  जैन इरिगेशनच्या अमेरिकेतील उपकंपनी समवेत आता ही विलीनीकरण झालेली नवी कंपनी मिळून अमेरिकेतील सर्वात मोठी सिंचन कंपनी म्हणून नावारूपास येईल.  अधिग्रहीत केलेल्या दोन्ही कंपन्यांचा डिसेंबर २०१६ अखेरीस एकत्रित व्यवसाय ११३ मिलीयन डॉलर्स म्हणजेच भारतीय मूल्यात होता 735 कोटी रुपये एवढा. जैन इरिगेशनच्या इतर उत्पादन शृंखलेसमवेत आब्झरव्हंट, प्युअरसेन्स, गाविश या आघाडीवर असलेल्या उत्पादनांनाही मिळेल चालना.  अधिग्रहीत कंपनीच्या सहकाऱ्यांद्वारे भविष्यातील व्यवसायाला मिळेल चालना.        जागतिक सिंचन बाजारपेठेतील जैन इरिगेशनची ही एक धोरणात्मक सर्वात मोठी गुंतवणूक ठरली आहे. जैन इरिगेशन इन कार्पोरेटेड या अमेरिकेतील कंपनीद्वारे यापूर्वीच जैन इरिगेशनने आपले भक्कम अस्तित्व तेथे निर्माण केले आहे. कॅलिफोर्निया येथील फ्रेस्नो मध्ये मुख्यालयातून तेथील कामकाज पाहिले जाते.  कॅलिफोर्नियात असलेल्या दुष्काळाची तीव्रता सध्याच्या पावसामुळे कमी झाली आहे. यामुळे जैन इरिगेशन नव्या विलिनीकरण झालेली कंपनीद्वारे सिंचन व्यवसायाची खूप मोठी बाजारपेठ येत्या 18 ते 24 महिन्यात काबीज करेल.         या विलिनीकरणामुळे जैन इरिगेशनला पुरवठा साखळी एकत्रित करण्यात मदत होईल तसेच शेतकऱ्यांसोबत थेट संबंध प्रस्थापित करता येतील. या कंपनीच्या एकात्मिक प्रकल्प उभारणीच्या अव्दितीय कौशल्यामुळे कंपनीला टर्नकी प्रोजेक्टच्या नियोजनापासून ते उभारणीपर्यंतचा सहभाग वाढवता येईल. सदर  विलिनीकरणास कोणत्याही सरकारी किंवा संस्थांच्या मान्यतांची आवश्यकता नाही. हा व्यवहार पुढील काही आठवड्यात पूर्णत्वास येईल.

“जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी भारतीय शेतकऱ्यांसमवेत संपूर्ण जगातील कृषी व शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा वेध घेतला होता. 1985 मध्ये त्यांनी अमेरिकेतील फ्रेस्नो या शहरात कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने पहिल्यांदा पाऊल ठेवले. त्यानंतर 1986 मध्ये जैन इरिगेशनने प्रकल्प सुरु केला. त्यावेळी ही भारतीय कंपनी काय करेल असे प्रश्न उपस्थित करून अनेकांनी भवरलालजींना स्वप्नवेडे म्हणले होते. सेवा, गुणवत्ता आणि उच्च तंत्रज्ञानाच्या बळावर आज अमेरिकेत जैन इरिगेशन क्रमांक 1 वर पोहोचली आहे. त्यांनी साध्य केलेल्या जागतिक विस्ताराच्या भक्कम पायावरच आता जैन इरिगेशनला अमेरिकेतील या दोन महत्त्वपूर्ण कंपन्यांचे अधिग्रहण करता येणे शक्य झाले. कृषी क्षेत्राबद्दलची ही कटिबद्धता आम्हाला आणखी दृढ करता आली याचा निश्चितच आनंद आहे. या अधिग्रहणातून जागतिक पातळीवर आघाडीवर असलेल्या जैन इरिगेशनचे उच्च कृषी तंत्रज्ञान अधिक भक्कम झाले आहे.”

अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सि. लि.

       “या धोरणात्मक गुंतवणुक व सहभागातून आमच्या उद्योग क्षेत्राला वेगळी दिशा देता आली याचा आम्हाला आनंद आहे. या अधिग्रहणातून जैन इरिगेशन कंपनीला कृषीकेंद्रीत आखणी आणि एकूणच क्षमतेत वाढ करण्यासही मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. याच बरोबर अत्याधुनिक शेती सिंचन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अधिक विस्तृत आणि अद्ययावत स्वरूपात देता येईल. विलिनीकरणासाठी सहकार्य लाभल्याबद्दल श्री. लॅरी रॉमपल, श्री. मायकेल कॉनरॅड, त्यांचे कुटुंबिय आणि सहकारी यांच्याविषय़ी आम्ही कृतज्ञता व्यक्त करून त्यांचेही अभिनंदन करतो.-अनिल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन सि. लि.         “माझे कुटुंबिय आणि सहकारी यांनी गेल्या ३४ वर्षात ऍग्री व्हॅलीची उभारणी केली. या वाटचालीनंतर आता जैन इरिगेशन समवेत भागीदारीसाठी आम्ही उत्सुक होतो. या विलिनीकरणानंतर आम्ही नव्या दमाने आपल्या कृषी क्षेत्रातील ग्राहकांना सर्वोत्त्म सिंचन प्रणाली आणि सेवा सुविधा उपलब्ध करून देऊ. -लॅरी रॉमपोल, मुख्य कार्यकारी अधिकारी, एग्री व्हॅली इरिगेशन “या तीन कंपन्या मिळून जी व्यापकता निर्माण झाली आहे त्याद्वारे शेतकऱ्यांना अतिउच्चपातळीची सेवा व सुविधा पुरवता येईल. हे विलिनीकरण म्हणजे एग्री व्हॅली इरिगेशन व जैन इरिगेशन यांच्या तत्वांचे विलिनीकरण असून ग्राहकांना जे योग्य असेल तेच तंत्रज्ञान आम्ही विकसित करून त्यांच्यापर्य़ंत पोहचवू. सिंचन क्षेत्राच्या विकासासाठी आम्ही एकत्रितरित्या आता प्रयत्नरत राहू.” – श्री. मायकेल कॉनरॅड, मुख्य कार्यकारी अधिकारी- इरिगेशन डिझाईन ऍन्ड कन्स्ट्रक्शन

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s