कष्टकरी शेतकऱ्यांना पुरस्कार समर्पित – अशोक जैन अशोक जैन यांना सॅम पित्रोदा यांच्याहस्ते मानाचा मॅक्सेल पुरस्कार प्रदान

भारतात १२ कोटींहून अधिक अल्पभूधारक शेतकरी आहे. या शेतकऱ्यांना उच्च कृषी तंत्रज्ञाना पुरवून त्यांच्या उत्पन्नात भर घालण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. मिळालेला हा पुरस्कार नम्रतेने स्वीकारला असून मी तो शेतात राबणाऱ्या माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांना अर्पण करीत आहे. असे मनोगत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केले. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक, तंत्रज्ञान गुरु सॅम पित्रोदा यांच्याहस्ते 5 मे रोजी पुणे येथे यशदा सभागृहात जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह राज्यातील उद्योजकांना मॅक्सेल पुरस्कार प्रदान करण्यात आले त्या प्रसंगी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. राज्यातील उद्योजकांसाठी मानाचे असणारे ‘महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलन्स’ अर्थात ‘मॅक्सेल पुरस्कार’ गेल्या 6 वर्षांपासून दिले जात आहेत.

ज्यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान झाले ते प्रमुख पाहुणे सॅम पित्रोदा आपल्या भाषणात म्हणाले की, तंत्रज्ञानामुळे जग बदलले आहे. भविष्यात तंत्रज्ञानामुळे अचाट कामगिरी होणार आहे. भारत हा कृषी प्रधान देश असल्याने शेती, दुग्धोत्पादन याला उच्च तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यावर विक्रमी उत्पादन घेता येईल असा विश्वास व्यक्त करून भारत हा युवकांचा देश आहे. सक्षम लोकशाहीचा देश आहे त्यामुळे भविष्यात भारताकडे जगाचा बघण्याचा दृष्टीकोन निश्चितच बदलेल असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला. आपल्यावर गांधी विचारांचा पगडा आहे. त्यांचा ओरिसा ते शिकागो हा प्रेरक प्रवास त्यांनी उपस्थितांना सांगितला.

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले की, जनकल्याणाचा दृष्टिकोन हेरुन फॉर्चुन मासिकाने जगभरातील कंपन्यांमधून जैन इरिगेशनला जगात परिवर्तन घडविणारी भारतातील एकमेव कंपनी म्हणून निवड करुन जगातील सातव्या क्रमांकाचा दर्जा दिलेला आहे. शेती व पाणी यावरील संशोधन व विकासासाठी ३ हजार एकर जमीन असलेली जैन इरिगेशन ही एकमेव कंपनी जगामध्ये आहे. परिश्रम, गुणवत्तेचा ध्यास, व्यवसाय शाश्वतता त्याच प्रमाणे शेतकऱ्यांचे कल्याण हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कंपनीची वाटचाल सुरु आहे. आमचे वडिल आदरणीय भवरलालजी जैन यांनी लावलेले छोटेसे रोपटे आता वटवृक्षात परावर्तित झाले आहे. ७ हजार रुपये इतक्या भांडवलावर स्थापन झालेली ही कंपनी आता ७ हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल करणारी आंतरराष्ट्रीय कंपनी नावारुपाला आलेली आहे. यासोबतच दर्जेदार उत्पादने, ग्राहकांसाठी मूल्यवर्धन देखील होत आहे. आम्ही या कंपनीच्या संपत्तीचे विश्वस्त म्हणून काम करीत आहोत या संपत्तीचा विनियोग जबाबदारीने करण्यावर आमचा भर असतो.

या सोहळ्यात जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांना ‘एक्सलन्स इन आंत्रप्रेन्युअरशिप’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सूक्ष्म ठिबकसिंचन, पाइप्स, प्रक्रिया केलेली कृषी उत्पादने, टिश्यू कल्चर व सौर पंप आदी क्षेत्रामध्ये केलेल्या अभूतपूर्व योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. यापूर्वी हा पुरस्कार निर्लेप उद्योग समूहाचे अध्यक्ष राम भोगले, विक्रम राजाध्यक्ष, दिपक गद्रे, सुहास काकडे, परशुराम जाधव, रवि पंडीत, किशोर पाटील, अशोक खाडे आणि भारत विकास ग्रुपचे संस्थापक हेमंत गायकवाड यांना प्रदान करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना मॅक्सेल फांउडेशनचे संस्थापक विश्वस्त तसेच कार्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांनी मॅक्सेल फांउडेशन आणि पुरस्कार देण्यामागची भूमिका विशद केली. या कार्यक्रमाचे संचालन कलाकार अजित भोळे यांनी केले होते. या पुरस्कार निवड समितीचे सदस्य जेष्ठ पत्रकार पद्मश्री कुमार केतकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी सुपर रेलिगेअर लॅबोरेटरीज लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. अविनाश फडके यांना ‘एक्सलन्स इन बिझिनेस लिडरशिप’, ‘एक्सलन्स इन इनोव्हेशन्स’, हा पुरस्कार शिवराय टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे सीओओ संजय बोरकर व संतोष शिंदे यांना तर चेतना पवार यांना मॅक्सेल ‘स्टार्टअप’ अवॉर्ड आणि चित्रा मेटे खास पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्यांना पुरस्काराने गौरवान्वित केले गेले त्यांच्या कार्याची ध्वनिचित्र फीत देखील उपस्थितांना दाखविण्यात आली होती.

यावेळी पद्मश्री किरण कर्णिक, माजी अध्यक्ष, नॅसकॉम यांना मॅक्सेल जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, कर्णिक यांना हा पुरस्कार २००१ ते २००८ या काळात ते नॅसकॉमचे अध्यक्ष असताना परदेशातील उद्योगासाठी त्यांनी प्रयत्न केले व ते उद्योग भरभराटीला आले. तसेच त्यांच्या ब्रॉडकॉस्टींग आणि आऊट सोर्सिंग क्षेत्रातील अतुलनिय कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.  विशेष पुरस्कार: चित्रा मेटे, उद्योजक, कलाकार. उद्योजक म्हणून त्यांची कंपनी चैत्रा क्रिएशन्स ॲन्ड पब्लिसिटी ही प्रमुख ब्रॅन्डसाठी कॉम्युनिकेशचा मजकूर बनवते, त्याचबरोबर सामाजिक विषयांसाठीही तो बनवते. समाजसेवक म्हणून त्या सुजाण नावाचा प्रकल्प राबवतात.

Ashokbhau Award 5 May 2017

भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक, तंत्रज्ञान गुरु सॅम पित्रोदा यांच्याहस्ते ‘एक्सलन्स इन आंत्रप्रेन्युअरशिप’ पुरस्कार स्वीकारता अशोक जैन शेजारी नितीन पोतदार, किरण कर्णिक आणि ज्येष्ठ संपादक कुमार केतकर

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s