News

स्वरानुभूती’ संगीत समारोहाचा समारोप

नृत्य, गायन आणि वादनाने रसिक मंत्रमुग्ध

अनुभूती निवासी शाळेतर्फे "पद्मश्री भवरलाल जैन स्मृती संगीत समारंभ-२०१७" अंतर्गत"स्वरानुभूति पुष्प दुसरे" या संगीतमहोत्सवाच्या समारोपाच्या दुसऱ्या दिवसाच्या सत्राचेउद्घाटन ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्याहस्ते कांताई सभागृहात करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रेय कराळे, सेवादास दलुभाऊ जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

देशातील ज्येष्ठ कलावंत, संगीतकार,वाद्यनिर्माते, लेखक यांच्यासह स्थानिककलावंताना हक्काचे व्यासपीठ मिळावे,जळगाव शहरात शास्त्रीय संगीताला प्रोत्साहनमिळावे, यासाठी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व अनुभूतीच्या संचालिका सौ.निशा जैन यांच्या पुढाकारातून ‘स्वरानुभूति’या संगीत महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यानिमित्ताने जळगावातील रसिकांना गायन, वादन आणि नृत्य यांची जुगलबंदीअनुभवली.

अनुभूती स्कूलतर्फे मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक हर्षल पाटील यांनी केले. यावेळी आर्या शेंदुर्णीकर यांच्या बहारदार कथ्थक नृत्यांने रसिक तृप्त झाले. आरंभी त्यांनी गणेशवंदना सादर केली. ‘अबके सावन घर आ जा’ बंदिश, केदार रागातील बंदिश सादर केली.

अनुभूती स्कुलचे संगीत शिक्षक निखिल क्षीरसागर यांचे गायन झाले. त्यांनी रागेश्री रागाने गायनास सुरवात केली. ‘वृंदावनी वेणू वाजे वृंदावणी…’ हे भजन सादर करून रसिकांना मोहिनी घातली. आकाश विश्वाल यांनी हार्मोनियमवर आणि अनुभूतीचा विद्यार्थी निशांत जैन यांनी तानपुऱ्यावर साथसंगत केली. इंदुरचे पंडीत कमल कामले यांचे व्हायोलीन वादन झाले. त्यांनी आपला आरंभ राग ‘जोग’ने केला. त्यांना अमृतेश मिश्रा यांनी तबल्यावर तर निशांत जैनने तानपुऱ्यावर साथ दिली.

जळगावच्या पंडीत संजय पत्की यांच्या गायनाने या महोत्सवात रंगत आणली.

कलाकारांचा पुरस्काराने गौरव

इंदूर येथील पं. कमल कामले यांचा आणि जळगाव येथील सुप्रसिद्ध कलाकार संजय पत्की यांचा डॉ भालचंद्र नेमाडे, दलीचंद जैन यांच्याहस्ते ‘स्वरानुभूती’ ने गौरव करण्यात आला. प्रेक्षकांमध्ये जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, पं विजयशंकर मिश्रा, कस्तुरी बंदोपाध्याय, डॉ भावना जैन, अविनाश जैन यांच्यासह शहरातील रसिक श्रोते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements

Re- जळगावच्या सौ.संगीता अ. घोडगांवकर यांची इनरव्हील डिस्ट्रिक्ट३०३च्य ा चेअरमनपदी नियुक्ती.

प्रति,

मा. संपादक महोदय,

सस्नेह नमस्कार.

आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्धीसाठी जळगावच्या सौ.संगीता अ. घोडगांवकर यांची इनरव्हील डिस्ट्रिक्ट३०३च्या चेअरमनपदी नियुक्तीची बातमी पाठवित आहोत. कृपया प्रसिद्धीस देऊन सहकार्य करावे ही विनंती.

https://jislblog.wordpress.com

आपले विश्वासू,

किशोर कुळकर्णी,

९४२२७७६७५९

Anil Naik

9158686350

सोबत – बातमी पीडीएफ, आरटीएफ आणि जेपीजीई फॉर्ममध्ये पाठवित आहोत.

Dear Sir,

Please see attachad news file. Kindly publish in our popular newpaper.

If there is any error please contact us.

With Warm Regards,

Kishor Kulkarni,

mobile – +91- 9422776759

E-mail – bhumiputra

Ghodgaonkar29617.docx

कष्टकरी शेतकऱ्यांना पुरस्कार समर्पित – अशोक जैन अशोक जैन यांना सॅम पित्रोदा यांच्याहस्ते मानाचा मॅक्सेल पुरस्कार प्रदान

भारतात १२ कोटींहून अधिक अल्पभूधारक शेतकरी आहे. या शेतकऱ्यांना उच्च कृषी तंत्रज्ञाना पुरवून त्यांच्या उत्पन्नात भर घालण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. मिळालेला हा पुरस्कार नम्रतेने स्वीकारला असून मी तो शेतात राबणाऱ्या माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांना अर्पण करीत आहे. असे मनोगत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केले. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक, तंत्रज्ञान गुरु सॅम पित्रोदा यांच्याहस्ते 5 मे रोजी पुणे येथे यशदा सभागृहात जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह राज्यातील उद्योजकांना मॅक्सेल पुरस्कार प्रदान करण्यात आले त्या प्रसंगी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. राज्यातील उद्योजकांसाठी मानाचे असणारे ‘महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलन्स’ अर्थात ‘मॅक्सेल पुरस्कार’ गेल्या 6 वर्षांपासून दिले जात आहेत. Continue reading “कष्टकरी शेतकऱ्यांना पुरस्कार समर्पित – अशोक जैन अशोक जैन यांना सॅम पित्रोदा यांच्याहस्ते मानाचा मॅक्सेल पुरस्कार प्रदान”

जैन इरिगेशनला एकात्मिक सूक्ष्मसिंचन प्रकल्पासाठी ५६९ कोटींची ऑर्डर

जळगाव 21 एप्रिल (प्रतिनिधी) :  भारतातील ठिबक सिंचन उत्पादक आणि शेतीतील अग्रगण्य कंपनी जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडला कर्नाटकाच्या जल संसाधन मंत्रालयाच्या कावेरी निरावरी निगम लिमिटेड विभागाच्यावतीने एकात्मिक सूक्ष्म सिंचन प्रकल्पासाठी नुकतीच ५६९ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली. कंपनीला गुणवत्तेच्या आधारे मिळालेली भारतातील ही सर्वात मोठी ऑर्डर आहे.

सदर योजनेचे भूमिपूजन काल (20 एप्रिल)  कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याहस्ते मालवली तालुका (जि. मंड्या) कर्नाटक येथे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी जलसंसाधन मंत्री एम. बी. पाटील तसेच कर्नाटक मंत्री मंडळातील अन्य मान्यवर, अधिकारी आणि 50 हजारहून अधिक शेतकरी या महत्त्वपूर्ण सोहळ्यास उपस्थित होते.

हा प्रकल्प कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील मलवल्ली तालुक्यात साकारण्यात येणार असून या प्रकल्पासाठी जैन इरिगेशनची राष्ट्रीय स्तरावर तुलनात्मक पद्धतीने निवड करण्यात आली आहे. जैन इरिगेशनने सन २०१४ मध्ये कर्नाटकाच्या हूनगुंड येथील रामथल प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला होता. या धर्तीवर ही ऑर्डर मिळाली आहे.

भारताच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांपर्यंत उच्च कृषी तंत्रज्ञान पोहोचण्यासाठी जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांची सदैव तळमळ होती. जागतिक गुणवत्तेच्या बळावर जैन इरिगेशनने कर्नाटकातील या अव्दितीय प्रकल्पाची ऑर्डर मिळविली असून 51 गावांच्या परिघातील या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या हजारों शेतकऱ्यांच्या जीवनमानात यातून अभूतपूर्व परिवर्तन घडेल. कर्नाटक सरकारचा हा प्रकल्प सर्वार्थाने सार्थक होण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याची प्रतिक्रिया जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी दिली.

 

या प्रकल्पात कर्नाटकातील मंड्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ५१ गावांचा समावेश असून यामुळे पंधरा हजार पेक्षा अधिक शेतक-यांना लाभ होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून २५,३१७ एकर क्षेत्र बागायतीखाली येणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे ८५ टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होईल. या क्षेत्रातील एकूण उपलब्ध 2.29 टीएमसी पाण्यापैकी या प्रकल्पाच्या माध्यमातून खरीप व रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी 1.97 टीएमसी पाण्याचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे मोठी जलबचत होणार असून उत्पादनही दुप्पट होणार आहे. जैन इरिगेशनच्या “संसाधन ते पिकांचे मूळ”या कल्पनेवर हा प्रकल्प उभारला जाणार असून शेतक-यांच्या थेट शेतापर्यंत पाईपलाईनद्वारे पाणी नेण्यात येईल. यामुळे साहजिकच पाणी आणि जमीनीची बचत साध्य होईल. याचबरोबर सूक्ष्म सिंचन सिस्टीम्स उभारल्यानंतर सुमारे ८५ % कार्यक्षमता वाढेल. कोरडवाहू आणि दुष्काळी भाग म्हणून परिचित असलेला हा परिसर या प्रकल्पामुळे समृद्ध होण्यास मदत होईल. या क्षेत्रात पारंपारिकरित्या भाताची शेती केली जाते. हे पीकदेखील ठिबक सिंचनाखाली येणार असल्याने कमी पाण्यात भरघोस उत्पादन शेतकऱ्यांना मिळेल.

जैन इरिगेशनच्या ठिबक सिंचन आणि स्प्रिंकर्लसच्या अत्याधुनिक साधनांद्वारे कावेरी नदीतून थेट पाणी घेऊन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत या प्रकल्पाद्वारे नेण्यात येणार आहे. यासाठी जैन इरिगेशनचे अतिउच्च दर्जाचे पाईप वापरण्यात येणार असून ज्याद्वारे थेंबभरही पाण्याचा अपव्यय होणार नाही. या पाण्याच्या वापराद्वारे तेथील शेतकरी भाजीपाला, डाळी, तेलबिया पिके, फुले आणि इतर उत्पादनांचा लागवडीसाठी उपयोग करु शकतील. सदर प्रकल्पासाठी वापरण्यात येणारे एचडीपीई पाईप हे किमान शंभर वर्ष सुस्थितीत राहतील.

या प्रकल्पाच्या माध्यमातून शक्य त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षणाद्वारे 10 हजार 127 एकर परिसरातील पाण्याचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. यामुळे ऊर्जेचीही मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. हा प्रकल्प एकात्मिकउपसा सूक्ष्म सिंचन या अद्वितीय संकल्पनेवर आधारित असून यामध्ये कालवा प्रक्षेत्रावर ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या वापरासाठी अत्याधुनिक स्वयंचलित पाणी पुरवठा करणारी योजना कार्यान्वित करण्यात येणार असून ज्याद्वारे पिकांची उत्पादकता वाढण्यास मदत होईल त्यासोबतच जमिनीची पोत सुधारण्यास मदत होईल. तसेच या प्रकल्पात एचडीपीई / पीव्हीसी पाईपद्वारे यंत्रणा उभारण्यात येऊन २५,३१७ एकर कालवाप्रक्षेत्राचे जलव्यवस्थापन या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

हा प्रकल्प पुढील १८ महिन्यात पूर्ण करायचा आहे आणि या प्रकल्पाद्वारे जैन इरिगेशनचे सूक्ष्म सिंचन,पाणी व्यवस्थापन, शेतीतील उत्पादन वाढीसाठी केले जाणारे विविध प्रयोग यासाठीच्या प्रयत्नांवर शिक्कामोर्तब होऊन देशाच्या शेती, पाणी विषयक कामास अधिक नावलौकीक प्राप्त होणार आहे. जैन इरिगेशनच्या ‘पाणी थेंबान पिक जोमानं®या ब्रिद वाक्यातून जल व अन्न सुरक्षीतते विषयी कटिबद्धता दृढ करते.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

 • पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांची कृषी क्रांतीची स्‍वप्‍नपूर्ती – 15 हजारपेक्षा अधिक शेतक-यांना या प्रकल्‍पाच्‍या माध्यमातून होणार लाभ.
 • या प्रकल्‍पामुळे भारताची उंचावली मान
 • एकूण 569 कोटी किमतीचा भारतातील सर्वात मोठा व प्रथम सूक्ष्म सिंचन प्रकल्प.
 • स्त्रोतापासुन मुळापर्यत सिंचन सुविधा देणारा एकात्मिक सूक्ष्म सिंचन प्रकल्प.
 • 85 टक्क्यांपर्यत पाणी वापर कायर्क्षमता देणारा प्रकल्प.
 • कर्नाटकातील मंड्या जिल्‍ह्‍यातील 51 गावांचा होईल कायापालट.
 • 25,317 एकर क्षेत्र येईल ओलिताखाली.
 • 10,127 एकर क्षेत्र गुरूत्‍वाकर्षणाद्वारे ओलिताखाली येईल.
 • जैन इरिगेशनच्‍या अतिउच्‍च दर्जेदार एचडीपीई पाईपांद्वारे जलव्‍यवस्‍थापन.
 • अत्‍याधुनिक व स्‍वयंचलित यंत्रणेमुळे उत्‍पादन क्षमतेत होईल भरघोस वाढ.
 • या प्रकल्‍पांतर्गत ओलिताखाली येणा-या जमिनीची पोत सुधारण्यास होईल मदत
 • परंपरागत शेतीला तिलांजली मिळून आधुनिक शेतीचा होईल स्‍वीकार

 • कमी पाण्यात, कमी श्रमात भरघोस उत्‍पादनाच्‍या मंत्राचा होईल साक्षात्‍कार
 • कोरडवाहू व दुष्काळग्रस्‍त भाग म्‍हणून असलेली ओळख पुसली जाऊन समृद्धीचे घडेल दर्शन