टिश्युकल्चर रोपे लागवडीची ‘ही मॅन’ची इच्छा

जळगाव, ता. ८ : जैव तंत्रज्ञानाने बनविण्यात आलेली केळी, डाळिंब, स्ट्रॉबेरी, पेरू, मोसंबीची रोगमुक्त रोपे पाहून आपण भारावलो असून माझ्या घरी ही रोपे लावून त्यांची फळे चाखायला मला आणि माझ्या कुटुंबियांना नक्कीच आवडेल, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया बॉलीवूडचे ‘ही मॅन’ म्हणून ओळखल्या जाणारे प्रसिद्ध अभिनेते धमेंद्र यांनी दिली. जैन हिल्सवरील बायोटेक लॅबला रविवारी सदिच्छा भेट देऊन त्यांनी शेती आणि शेतीशी संबंधित उच्च कृषी तंत्रज्ञानाची विस्तृत माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत राज्याचे कृषी व महसूल मंत्री एकनाथरावजी खडसे, खासदार रक्षा खडसे, रोहिणी खडसे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सह व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन उपस्थित होते. Continue reading “टिश्युकल्चर रोपे लागवडीची ‘ही मॅन’ची इच्छा”

Advertisements

शेतीतील तण व्यवस्थापनासाठी ठिबक तंत्राचाच प्रभावी उपयोग

जळगाव, ता ३० : पिकातील तणाचे व्यवस्थापन करण्यासाठी ठिबकसारख्या उच्च कृषी तंत्रज्ञानाचा वापर शाश्वत व प्रभावी असून याद्वारे तणांचे ७० टक्केपर्यंत नियंत्रण होते. शेतकऱ्यांची एरवी तण व्यवस्थापनात होणारी दमछाक व खर्च टाळण्यासाठी ठिबक प्रणाली अधिक निसर्ग पूरक असल्याने यासाठी पुढाकार घेण्याची गरज राष्ट्रीय तण व्यवस्थापनावरील वार्षिक आढावा बैठकीत झालेल्या विचारमंथनातून शास्त्रज्ञांनी बोलून दाखविली. जबलपूर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन परिषदेच्या तण व्यवस्थापन संचालनालयाची जैन हिल्स येथे आयोजित २३ व्या वार्षिक आढावा बैठकीचा आज समारोप झाला. भारताच्या विविध राज्यांतील कृषी शास्त्रज्ञ आणि संशोधक या बैठकीत सहभागी झाले होते. Continue reading “शेतीतील तण व्यवस्थापनासाठी ठिबक तंत्राचाच प्रभावी उपयोग”

भवरलालजी जैन यांचा राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट उद्यमिता पुरस्काराने जम्मूकाश्मीर येथे गौरव

जळगाव दि. २८ (प्रतिनिधी): जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांना यावर्षीचा काउंसील ऑफ स्टेट इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ॲन्ड इन्व्हेसमेंट कार्पोरेशन ऑफ इंडीया (कॉसीडीसी) चा उत्कृष्ठ उद्यमिता पुरस्कार बहाल करण्यात आला. जम्मूकाश्मीरचे वाणिज्य उद्योगमंत्री चंदर प्रकाश गंगा यांचा हस्ते हा पुरस्कार जैन इरिगेशनचे दिल्ली येथील वरिष्ठ सहकारी विजयकुमार लाभ यांनी स्वीकारला. यावेळी कॉसीडीसीचे अध्यक्ष पी जॉय ओमेन, जम्मू ॲन्ड कश्मीर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तथा कॉसीडीसीचे उपाध्यक्ष अमीत शर्मा व देशभरातील निमंत्रीत उद्योजक या समारंभासाठी उपस्थित होते. Continue reading “भवरलालजी जैन यांचा राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट उद्यमिता पुरस्काराने जम्मूकाश्मीर येथे गौरव”

निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी जमीन, खत व पाण्याचे व्यवस्थापन आवश्यक

जळगाव, दि. 16 (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात डाळिंब लागवड क्षेत्र अधिक आहे, परंतु निर्यातक्षम, गुणवत्तेच्या डाळिंब उत्पादनासाठी डाळिंबाची रोगमुक्त टिश्युकल्चर रोपे, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून खते व पाण्याचे सुयोग्य नियोजन या गोष्टिवर विशेष भर देणे आवश्यक आहे असा सूर राष्ट्रीय डाळिंब परिषदेच्या तांत्रिक सत्रात तज्ज्ञांनी काढला. Continue reading “निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी जमीन, खत व पाण्याचे व्यवस्थापन आवश्यक”