सकस अन्ननिर्मितीचा ध्यास घेणारी जितूभाईंची सेंद्रिय शेती

सकस, दर्जेदार अन्न शेतीतून पिकविण्याच्या दृष्टीने सायने (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथील थोर गोसेविका स्व. जमनाबेन कुटमुटिया यांचे सुपुत्र जितेंद्रभाई कुटुमुटिया यांनी आपली जमीन सेंद्रिय कर्ब, लाभदायक जिवाणू व सुपीक घटक यांनी श्रीमंत केली आहे. त्यांचा “निसर्गप्रेम’ फार्म म्हणजे सेंद्रिय शेतीची खुली प्रयोगशाळाच झाली आहे. साधारणपणे २०१० पासून सुरु झालेल्या या त्यांच्या प्रयोगाला आता चांगले स्वरुप प्राप्त झालेले आहे. सकस अन्ननिर्मितीचा ध्यास घेणाऱ्या जितेंद्र कुटमुटिया यांच्या प्रेरणादायी यशस्वी सेंद्रीय शेतीच्या प्रयोगाबाबत त्यांच्याशी जैन इरिगेशनचे पत्रकार किशोर कुळकर्णी यांच्याशी झालेल्या चर्चेचा संपादीत गोषवारा…

Continue reading “सकस अन्ननिर्मितीचा ध्यास घेणारी जितूभाईंची सेंद्रिय शेती”

Advertisements

जलयोगी : डॉ. भवरलाल जैन

जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगावचे संस्थापक भवरलालजी जैन यांचे अल्पशा आजाराने २५ फेब्रुवारी २०१६ रोजी वयाच्या ७९ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या जीवनप्रवासावर प्रकाशझोत टाकणारा हा लेख. Continue reading “जलयोगी : डॉ. भवरलाल जैन”

मागेल त्याला सौर कृषिपंपाची ‘नाबार्ड’ची योजना

शिरसोली, जळगाव, ता. १७ : मागेल त्या शेतकऱ्याला सौर कृषी पंप अशी नाबार्डची योजना असून या योजनेंतर्गत शेतकऱ्याला ४० टक्के अनुदान मिळते. वीज तुटवडा आणि भारनियमनातून मुक्त होण्यासाठी सौर कृषी पंपाचा वापर शेतकऱ्यांना फायदेशीर होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विजय भारंबे यांनी दिली. शिरसोली येथील भगवान बारी यांच्या शेतात संपन्न झालेल्या शेतकरी चर्चासत्रात व कृषी मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते. Continue reading “मागेल त्याला सौर कृषिपंपाची ‘नाबार्ड’ची योजना”

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्चतंत्र पुरस्काराची तपपूर्ती

काळानुरुप उच्च आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात येणारी शेती फायदेशीर ठरत आहे. त्याचाच परिपाक म्हणून उत्पादन वाढीसोबत उत्पादनाच्या गुणवत्तेतदेखील अनेक पटींनी वाढ झाल्याची उदाहरणे आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमलणारे हास्य, आनंद हेच खऱ्या अर्थाने जैन उद्योग समुहाचे फलित आहे. या कृतार्थ भावनेतून समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून या पुरस्कारांची निर्मिती झाली आहे. Continue reading “पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्चतंत्र पुरस्काराची तपपूर्ती”