जैन इरिगेशन व जैन फार्मफ्रेश फूडस् लिमिटेडमध्ये युकेच्या मंडाला व प्रवर्तकांची 804 कोटी रुपयांची गुंतवणूक

 

मुंबई,ता. ३०मार्च : कृषी आणि फळ व भाजीपाला प्रक्रियेतजगातअव्वलअसलेल्याजैनइरिगेशन सिस्टिम्स लि. व नव्याने स्थापित झालेल्या जैन फार्मफ्रेश फूडस् लिमिटेड कंपनीमध्येआज ग्रेटब्रिटन येथील वित्तीय संस्थेत अग्रणी असलेल्या मंडालाकॅपीटलने भरघोस अशी 804 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगात इतक्या मोठ्या प्रमाणावर नव्याने येणाऱ्या या गुंतवणुकीचे सर्वत्र आनंदात स्वागत केले जात असून कंपनीच्या इतिहासातील हा एक मोलाचा टप्पा म्हणून याकडे पाहिले जात आहे. Continue reading “जैन इरिगेशन व जैन फार्मफ्रेश फूडस् लिमिटेडमध्ये युकेच्या मंडाला व प्रवर्तकांची 804 कोटी रुपयांची गुंतवणूक”

Advertisements

पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

जळगाव, १3 : शेतमाल प्रक्रियेच्या क्षेत्रात १९९४ पासून कार्यरत राहून रोजगारनिर्मितीबरोबरच शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी आणणारी जैन इरिगेशन कंपनी आता विदर्भातील शेतकऱ्यांसाठी संत्रा प्रक्रिया उद्योग उभारणार आहे. केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी धोरणांपैकी एक असलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात देशाचे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत यासंदर्भात शनिवारी (ता. १३) मुंबईत सामंजस्य करार करण्यात आला. Continue reading “पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार”

किरकोळ बाजारपेठेत जैन फूड डिव्हिजनचे पदार्पण

‍जळगाव, ता. ८ : शेतकऱ्यांच्या शेतमालावर प्रक्रिया करून त्यांना बाजारभावाचे स्थैर्य देणारी जैन इरिगेशन कंपनी आता रिटेल बाजारपेठेत ग्राहकांसाठी लवकरच प्रक्रियायुक्त शेतमाल उत्पादनांची मालिका सादर करणार आहे. या मालिकेतील पहिले उत्पादन असलेले ‘जैन फार्मफ्रेश आमरस’ मुंबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाला असून येत्या ६ महिन्यांत उर्वरित महाराष्ट्रात तसेच गुजरात, मध्य प्रदेशसह पश्चिमी व उत्तेकडील राज्यांतील किरकोळ ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. Continue reading “किरकोळ बाजारपेठेत जैन फूड डिव्हिजनचे पदार्पण”