मिरज रेल्वे पाईपलाइनच्या युद्धपातळीवरील पूर्तीसाठी सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी केला जैन इरिगेशनचा गौरव

जळगाव, ता. २ : लातूरकरांसाठी रेल्वेने दिल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे ३ किलोमीटर पाईपलाईन जैन इरिगेशन कंपनीने वेळेत उभारल्याबद्दल सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी अध्यक्ष अशोक जैन यांना खास पत्र पाठवून या कामाबद्दल गौरव केला आहे. पाईप व सूक्ष्मसिंचनाच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांजवळ उन्हाळ्यात वेळ असल्याने या काळात जैन इरिगेशनकडे विविध उत्पादनाची मागणी मोठ्या प्रमाणात असते. अशा व्यस्त वेळापत्रकातही मिरजसाठी त्यांच्या गरजेनुरूप विशेष आकाराचे पाईप जैन कंपनीने तयार करून दिल्याने हे काम वेळेत शक्य झाले. Continue reading “मिरज रेल्वे पाईपलाइनच्या युद्धपातळीवरील पूर्तीसाठी सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी केला जैन इरिगेशनचा गौरव”

Advertisements