कांतिलाल हिरालाल जैन अनंतात विलीन

येथील ज्येष्ठ उद्योजक कांतिलालजी हिरालालजी जैन यांच्या पार्थिवावर जैन हिल्स येथे साश्रुनयनांनी सकाळी अंत्यसंस्कार केले गेले. त्यांचे पुत्र अभय आणि अविनाश, नातू आर्यम तसेच पुतणे अशोकभाऊ, अनिल, अजित, अतुल व अथांग यांनी अग्निडाग दिला. मा. आ. सुरेशदादा जैन, अरुणभाई गुजराथी, कविवर्य ना. धों. महानोर, मा. आ. गुरुमुख जगवानी, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, रतनलालजी बाफना, कस्तुरचंद बाफना, उद्योजक रजनिकांत कोठारी, रवींद्र भैय्या पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या अंत्यसंस्कारास विविध समाजाच्या सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कांतिलालजींना फुफ्फुसात जंतू संसर्ग, लिव्हरचा आजारावर उपचार करण्यासाठी मुंबईच्या ग्लोबल हॉस्पीटलमध्ये इलाजासाठी दाखल करण्यात आले होते. 4 एप्रील रोजी उपचारादरम्यान 74 व्या वर्षी दुःखद निधन झाले होते.  जैन ब्रदर्सच्या सुरूवातीपासूनच्या वाटचालीत त्यांचा अत्यंत मोलाचा सहभाग होता. ते जैन उद्योग समूहाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते.

सकाळी 8 वाजता कांतिलालजी जैन यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा सुरू झाली. जैन हिल्स येथे त्यांच्यावर विधीवत संस्कार करण्यात आले. सेवादास दलुभाऊ जैन यांनी मांगलीक म्हटली तसेच स्व. कांतिलालजी जैन यांच्या स्मृतिंना उजाळा दिला. त्यात ते म्हणाले की, पुतण्या कांतिलाल यांनी आपल्या नावापुढे चोरडीया हे आडनाव लावणारा परिवारातील सदस्य होता. हसतमुख व अत्यंत दिलदार स्वभाव त्यांचा होता.

आपले ज्येष्ठ बंधू पद्मश्री भवरलालजी जैन यांच्या निधनानंतर 13 महिन्यात लहानभाऊ कांतिलालजी जैन यांची जीवनयात्रा पूर्ण झाली. परमेश्वर जैन परिवारास त्यांच्या वियोगाचे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करण्याबाबत परमेश्वराकडे प्रार्थना करू या असे ज्येष्ठ समाजसेवी तथा शाकाहार सदाचार परिषदेचे प्रणेते रतनलालजी बाफना यांनी उपस्थितांसमोर श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी काल अभय जैन, अशोक जैन व जैन परिवारातील सदस्यांची निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली.  (जळगाव 5 एप्रील 2017)

Advertisements

माणसात राहून माणसासारखे आचरण करणे ही मनुष्यत्त्वाची मुख्य खूण- डॉ. बिपीन दोशी

महावीरांचा कोणताच पंथ नव्हता, ते जैन धर्माचे प्रखर प्रचारक होते. आपण सुखी कसे राहायचे हा मूलमंत्र त्यांनी समस्त मानवी समाजाला दिला. क्रोध, मान, माया, लोभ हे चार दुर्गुण आपले सुख हिरावून घेत असतात. आपण जन्माला येताना जसे काही सोबत आणत नाहीत तसे जातानाही रित्या हातीच जावे लागते हे माहिती असूनदेखील आपण स्वार्थ मोहापायी आयुष्याचे सुंदर क्षण जगणे विसरुन माया, मोहाच्या जाळ्यात फसतो. जे आपले नाही, जे आपले होणार नाही त्यासाठी आपण करीत असलेला आटापिटा स्वतःलाच दुःख देणारा असल्याचे मत प्रा. डॉ. बिपीनजी दोशी यांनी व्यक्त केले. सकल जैन श्री संघ जळगावच्यावतीने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त बालगंधर्व खुले नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. Continue reading “माणसात राहून माणसासारखे आचरण करणे ही मनुष्यत्त्वाची मुख्य खूण- डॉ. बिपीन दोशी”

गांधी रिसर्च फाउंडेशनच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती जैन हिल्स स्थित गांधी रिसर्च फाउंडेशनच्यावतीने साजरी करण्यात आली. गांधीतीर्थ परिसरात सकाळी सामूहिक प्रार्थना करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देण्यात आली. Continue reading “गांधी रिसर्च फाउंडेशनच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन”

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा दिवस साजरा

१४ एप्रिल हा दिवस भारत सरकारच्या आदेशान्वये “आग सेवा दिवस” म्हणून पाळला जातो. याच अनुषंगाने जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या जैन हिल्स, जैन व्हॅली, जैन प्लॅस्टिक पार्कसह विविध आस्थापनात अग्निशमन सेवा दिवस साजरा करण्यात आला. याबरोबरच दरवर्षांप्रमाणेच या वर्षीदेखील १४ ते २० एप्रिल दरम्यान ‘सुरक्षा सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले आहे. ‘आपले जीवन व संपत्ती वाचविणारा खरा सोबती – फायरमन’ या संकल्पनेवर आधारित हा सप्ताह साजरा करण्यात  येत आहे. आजपासून या सप्ताहाची सुरुवात झाली असून अग्नीशमन विभागातील आग विझवणा-या साहित्य व अग्नीशमन वाहनाचे पूजन वरिष्ठ अधिकारी सुनिल देशपांडे यांनी केले. तसेच मुंबई डॉकयार्ड व इतर आगीच्या अपघातांमध्ये वीरगती प्राप्त झालेल्या अग्नी सुरक्षा रक्षकांना श्रदधांजली अपर्ण करण्यात आली. यावेळी कंपनीचे वरिष्ठ सहकारी एस डी गुप्ता, व्ही पी पाटील, संजय पारख व इतर सहकारी उपस्थित होते. Continue reading “जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा दिवस साजरा”