दूरदर्शनच्या पुरस्काराने अनिल जैन यांचा सन्मान राज्यपालांनी केला जैन इरिगेशनच्या कार्याचा गौरव

मुंबई – दि. 12 (प्रतिनिधी) –

महाराष्ट्राची भूमी ही समृद्ध भूमी आहे. इथली जमीन सुपीक आहे. दुर्दैवाने आज महाराष्ट्रातील मराठवाडा व इतर काही भाग तीव्र दुष्काळाने होरपळत आहे. यातून सावरण्यासाठी पाण्याच्या प्रभावी व्यवस्थापनाची तीव्र गरज असून जागतिक पातळीवर आघाडीवर असलेल्या जैन इरिगेशनने आपल्या कार्याची व्याप्ती आणखी वाढवून पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. ते मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री नवरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.

Continue reading “दूरदर्शनच्या पुरस्काराने अनिल जैन यांचा सन्मान राज्यपालांनी केला जैन इरिगेशनच्या कार्याचा गौरव”

पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

जळगाव, १3 : शेतमाल प्रक्रियेच्या क्षेत्रात १९९४ पासून कार्यरत राहून रोजगारनिर्मितीबरोबरच शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी आणणारी जैन इरिगेशन कंपनी आता विदर्भातील शेतकऱ्यांसाठी संत्रा प्रक्रिया उद्योग उभारणार आहे. केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी धोरणांपैकी एक असलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात देशाचे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत यासंदर्भात शनिवारी (ता. १३) मुंबईत सामंजस्य करार करण्यात आला. Continue reading “पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार”

कृषी क्षेत्राच्या जलसुरक्षेसाठी उच्च तंत्रज्ञानासह एकात्मिक नियोजनावर भर आवश्यक

जळगाव, ता. ८ जानेवारी २०१६- भारतात उपलब्ध असलेल्या जलसंसाधनांचा विचार करता पाण्याच्या काटेकोर नियोजनाच्या दृ्ष्टीने कृषीक्षेत्राच्या विकासासाठी यापुढे अधिक एकात्मिक नियोजनावर भर देणे आवश्यक आहे. या दृष्टीने जैन इरिगेशनने जलबचतीमध्ये ठिबकच्या माध्यमातून जो आयाम निर्माण केला आहे Continue reading “कृषी क्षेत्राच्या जलसुरक्षेसाठी उच्च तंत्रज्ञानासह एकात्मिक नियोजनावर भर आवश्यक”

हार्वर्ड विद्यापीठ आशिया कॉन्फरन्समध्ये जळगावच्या आशुली जैनचा सहभाग

मुंबई – (प्रतिनिधी) – मुंबईच्या सेंट झेवियर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांची नात व कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन व अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांची कन्या कु. आशुलीसह कॉलेजचे अन्य ७ विद्यार्थी भारताचे प्रतिनिधीत्व करीत अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात, आशिया कॉन्फरन्समध्ये सहभागी होत आहेत. Continue reading “हार्वर्ड विद्यापीठ आशिया कॉन्फरन्समध्ये जळगावच्या आशुली जैनचा सहभाग”