सकस अन्ननिर्मितीचा ध्यास घेणारी जितूभाईंची सेंद्रिय शेती

सकस, दर्जेदार अन्न शेतीतून पिकविण्याच्या दृष्टीने सायने (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथील थोर गोसेविका स्व. जमनाबेन कुटमुटिया यांचे सुपुत्र जितेंद्रभाई कुटुमुटिया यांनी आपली जमीन सेंद्रिय कर्ब, लाभदायक जिवाणू व सुपीक घटक यांनी श्रीमंत केली आहे. त्यांचा “निसर्गप्रेम’ फार्म म्हणजे सेंद्रिय शेतीची खुली प्रयोगशाळाच झाली आहे. साधारणपणे २०१० पासून सुरु झालेल्या या त्यांच्या प्रयोगाला आता चांगले स्वरुप प्राप्त झालेले आहे. सकस अन्ननिर्मितीचा ध्यास घेणाऱ्या जितेंद्र कुटमुटिया यांच्या प्रेरणादायी यशस्वी सेंद्रीय शेतीच्या प्रयोगाबाबत त्यांच्याशी जैन इरिगेशनचे पत्रकार किशोर कुळकर्णी यांच्याशी झालेल्या चर्चेचा संपादीत गोषवारा…

Continue reading “सकस अन्ननिर्मितीचा ध्यास घेणारी जितूभाईंची सेंद्रिय शेती”

संग्रहालयातील नाण्यांच्या माध्यमातून सांस्कृतिक एकात्मतेचे घडते दर्शन- महाराष्ट्र राज्य पुराभिलेखागारचे संचालक डॉ. दिलीप बलसेकर

संग्रहालयातील विविध कालखंडातील नाण्यांच्या माध्यमातून सांस्कृतिक एकात्मतेचे दर्शन घडते. नाण्यांना वाचण्याची कला मात्र अवगत असणे आवश्यक असल्याचे विचार महाराष्ट्र राज्य पुराभिलेखागारचे संचालक डॉ. दिलीप बलसेकर यांनी व्यक्त केले. ‘आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस’च्या औचित्याने गांधीतीर्थ येथे हॉबी क्लब मधील सदस्यांच्या दुर्मिळ ऐतिहासिक वस्तुंचे प्रदर्शन त्याच प्रमाणे संग्रहालय आणि सांस्कृतिक एकात्मता या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. जिल्हाधिकारी सौ. रुबल अग्रवाल, गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त सेवादास दलुभाऊ जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, हॉबी क्लब जळगावचे मजीद झकेरिया, सुरेश पांडे यावेळी व्यासपीठावर उपलब्ध होते. Continue reading “संग्रहालयातील नाण्यांच्या माध्यमातून सांस्कृतिक एकात्मतेचे घडते दर्शन- महाराष्ट्र राज्य पुराभिलेखागारचे संचालक डॉ. दिलीप बलसेकर”

हे तर जगाला अहिंसेचा मंत्र देणारे केंद्र -हिरोशी शिमो, उपराज्यपाल, वाकायामा, जपान गांधी म्युझियमला जपानी शिष्टमंडळाची भेट

महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याशी आणि त्यांच्या शांतीच्या संदेशाशी आम्ही खूप मनापासून जुळलेलो आहोत. जपानमध्ये शालेय अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना गांधींचे जीवनकार्य शिकविले जाते. आम्ही त्यांच्याविषयी जो अभ्यास केला त्याची प्रत्यक्षातील अनुभूती आम्हाला इथे गांधीतीर्थच्या म्युझियममध्ये अनुभवावयास मिळाल्याचे गौरवोद्‍‌गार जपानच्या वाकायामाचे उपराज्यपाल हिरोशी सिमो यांनी काढले. त्यांनी आज गांधी तीर्थला भेट देऊन संपूर्ण म्युझियमची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत थोरु कितायामा, योशिओ यामाशिता, अकिओ नाकागावा, हिदेकाज हिराई, तुषार टिंगोटे, महाराष्ट्र टूरिझम डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक आण्णासाहेब शिंदे, शैलेंद्र बोरसे आदी उपस्थित होते. Continue reading “हे तर जगाला अहिंसेचा मंत्र देणारे केंद्र -हिरोशी शिमो, उपराज्यपाल, वाकायामा, जपान गांधी म्युझियमला जपानी शिष्टमंडळाची भेट”