जैन इरिगेशनद्वारा अमेरिकेतील दोन सिंचनप्रणित कंपन्यांचे अधिग्रहण

मुंबई, १९ एप्रिल (प्रतिनिधी):- जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडने त्यांच्या अमेरिकेतील (युएसए) उपकंपनीच्या माध्यमातून दोन मोठ्या सिंचनप्रणित कंपन्यांचे ८० टक्के भागभांडवल खरेदी करून अधिग्रहण केले आहे. अमेरिकेतील ऍग्री व्हॅली इरिगेशन (एव्हीआय) आणि इरिगेशन डिझाईन एण्ड कन्स्ट्रक्शन (आयडीसी) या सूक्ष्मसिंचन क्षेत्रातील  सर्वात मोठ्या वितरक कंपन्या म्हणून ओळखल्या जातात. या दोन्ही कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीनंतर एक स्वतंत्र नवीन वितरण कंपनी जैन इऱिगेशन स्थापन करणार आहे. याद्वारे अमेरिकेतील शेतकऱ्यांना जैन इरिगेशनच्या अत्याधुनिक उच्चकृषी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक नावीन्यपूर्ण असे उच्चकृषी तंत्रज्ञान, त्याचे आरेखन, सेवा व उभारणी दिली जाईल व यातून त्यांना मोअर क्रॉप पर ड्रॉप ची अनुभूती घेता येईल.   Continue reading “जैन इरिगेशनद्वारा अमेरिकेतील दोन सिंचनप्रणित कंपन्यांचे अधिग्रहण”

जैन इरिगेशनचा कामगार कल्याणाबाबत पारितोषिक वरिष्ठ अधिकारी सी.एस नाईक यांनी स्वीकारला गौरव

नाशिक विभागातील औद्योगिक क्षेत्रात कामगारांसाठी सर्वाधिक नवीनतम कल्याणकारी योजना राबविल्याबद्दल जैन इरिगेशनचा व्दितिय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागातर्फे महाराष्ट्रात पहिल्यांदाच या पुरस्कारासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. एक हजारहून जास्त कर्मचारी असलेल्या मोठ्या कंपन्यांच्या गटातून मिळालेले हे पारितोषिक कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सी.एस. नाईक यांनी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सह संचालक एम. एस. प्रभावळे व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहाय्यकसंचालक सौ. आढे  यांच्याहस्ते स्वीकारले. हा कार्यक्रम नाशिक (अंबड) सहानी इंडस्ट्रीजच्या प्रांगणात 31 मार्च रोजी पार पडला. Continue reading “जैन इरिगेशनचा कामगार कल्याणाबाबत पारितोषिक वरिष्ठ अधिकारी सी.एस नाईक यांनी स्वीकारला गौरव”

कांतिलाल हिरालाल जैन अनंतात विलीन

येथील ज्येष्ठ उद्योजक कांतिलालजी हिरालालजी जैन यांच्या पार्थिवावर जैन हिल्स येथे साश्रुनयनांनी सकाळी अंत्यसंस्कार केले गेले. त्यांचे पुत्र अभय आणि अविनाश, नातू आर्यम तसेच पुतणे अशोकभाऊ, अनिल, अजित, अतुल व अथांग यांनी अग्निडाग दिला. मा. आ. सुरेशदादा जैन, अरुणभाई गुजराथी, कविवर्य ना. धों. महानोर, मा. आ. गुरुमुख जगवानी, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, रतनलालजी बाफना, कस्तुरचंद बाफना, उद्योजक रजनिकांत कोठारी, रवींद्र भैय्या पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या अंत्यसंस्कारास विविध समाजाच्या सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कांतिलालजींना फुफ्फुसात जंतू संसर्ग, लिव्हरचा आजारावर उपचार करण्यासाठी मुंबईच्या ग्लोबल हॉस्पीटलमध्ये इलाजासाठी दाखल करण्यात आले होते. 4 एप्रील रोजी उपचारादरम्यान 74 व्या वर्षी दुःखद निधन झाले होते.  जैन ब्रदर्सच्या सुरूवातीपासूनच्या वाटचालीत त्यांचा अत्यंत मोलाचा सहभाग होता. ते जैन उद्योग समूहाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते.

सकाळी 8 वाजता कांतिलालजी जैन यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा सुरू झाली. जैन हिल्स येथे त्यांच्यावर विधीवत संस्कार करण्यात आले. सेवादास दलुभाऊ जैन यांनी मांगलीक म्हटली तसेच स्व. कांतिलालजी जैन यांच्या स्मृतिंना उजाळा दिला. त्यात ते म्हणाले की, पुतण्या कांतिलाल यांनी आपल्या नावापुढे चोरडीया हे आडनाव लावणारा परिवारातील सदस्य होता. हसतमुख व अत्यंत दिलदार स्वभाव त्यांचा होता.

आपले ज्येष्ठ बंधू पद्मश्री भवरलालजी जैन यांच्या निधनानंतर 13 महिन्यात लहानभाऊ कांतिलालजी जैन यांची जीवनयात्रा पूर्ण झाली. परमेश्वर जैन परिवारास त्यांच्या वियोगाचे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करण्याबाबत परमेश्वराकडे प्रार्थना करू या असे ज्येष्ठ समाजसेवी तथा शाकाहार सदाचार परिषदेचे प्रणेते रतनलालजी बाफना यांनी उपस्थितांसमोर श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी काल अभय जैन, अशोक जैन व जैन परिवारातील सदस्यांची निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली.  (जळगाव 5 एप्रील 2017)

माणसात राहून माणसासारखे आचरण करणे ही मनुष्यत्त्वाची मुख्य खूण- डॉ. बिपीन दोशी

महावीरांचा कोणताच पंथ नव्हता, ते जैन धर्माचे प्रखर प्रचारक होते. आपण सुखी कसे राहायचे हा मूलमंत्र त्यांनी समस्त मानवी समाजाला दिला. क्रोध, मान, माया, लोभ हे चार दुर्गुण आपले सुख हिरावून घेत असतात. आपण जन्माला येताना जसे काही सोबत आणत नाहीत तसे जातानाही रित्या हातीच जावे लागते हे माहिती असूनदेखील आपण स्वार्थ मोहापायी आयुष्याचे सुंदर क्षण जगणे विसरुन माया, मोहाच्या जाळ्यात फसतो. जे आपले नाही, जे आपले होणार नाही त्यासाठी आपण करीत असलेला आटापिटा स्वतःलाच दुःख देणारा असल्याचे मत प्रा. डॉ. बिपीनजी दोशी यांनी व्यक्त केले. सकल जैन श्री संघ जळगावच्यावतीने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त बालगंधर्व खुले नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. Continue reading “माणसात राहून माणसासारखे आचरण करणे ही मनुष्यत्त्वाची मुख्य खूण- डॉ. बिपीन दोशी”