शेतीतील तण व्यवस्थापनासाठी ठिबक तंत्राचाच प्रभावी उपयोग

जळगाव, ता ३० : पिकातील तणाचे व्यवस्थापन करण्यासाठी ठिबकसारख्या उच्च कृषी तंत्रज्ञानाचा वापर शाश्वत व प्रभावी असून याद्वारे तणांचे ७० टक्केपर्यंत नियंत्रण होते. शेतकऱ्यांची एरवी तण व्यवस्थापनात होणारी दमछाक व खर्च टाळण्यासाठी ठिबक प्रणाली अधिक निसर्ग पूरक असल्याने यासाठी पुढाकार घेण्याची गरज राष्ट्रीय तण व्यवस्थापनावरील वार्षिक आढावा बैठकीत झालेल्या विचारमंथनातून शास्त्रज्ञांनी बोलून दाखविली. जबलपूर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन परिषदेच्या तण व्यवस्थापन संचालनालयाची जैन हिल्स येथे आयोजित २३ व्या वार्षिक आढावा बैठकीचा आज समारोप झाला. भारताच्या विविध राज्यांतील कृषी शास्त्रज्ञ आणि संशोधक या बैठकीत सहभागी झाले होते. Continue reading “शेतीतील तण व्यवस्थापनासाठी ठिबक तंत्राचाच प्रभावी उपयोग”